Maval : श्रीमती भामाबाई बोत्रे यांना जीवन गौरव पुरस्कार

एमपीसी न्यूज – भंडारा डोंगर उतारावर सागाच्या झाडांची लागवड, तसेच जंगली झाडांची ( Maval) लागवड करून त्यांचे संगोपन करणाऱ्या सुदवडी गावच्या भामाबाई बोत्रे यांना श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान आणि कराळे पाटील परिवार सुदवडी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुदवडी ते भंडारा डोंगर प्रत्येक महिन्याच्या दशमीला त्यांनी अनेक वर्ष वारी केली. तुकाराम महाराजांवर अतिशय श्रद्धा असलेल्या वारकरी म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे.

कार्यक्रमासाठी भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, सुदवडी गावचे सरपंच सुमित शिवाजीराव कराळे पाटील,शनि शिंगणापूरचे विश्वस्त पंढरीनाथ भाऊ, अवधूत,मकरंद विद्यापीठचे विश्वस्त विनायक महाराज कांबेकर रासायनी रायगड, मावळ बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे,भामाबाईं बोत्रे यांचे नातू संदीप पाचारणे संस्थांनचे विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, सेक्रेटरी जोपाशेठ पवार, विश्वस्त दत्तोबा कराळे पाटील, टेमगिरे महाराज, किसनराव कराळे पाटील, श्री डेरंगे मामा,वसंतराव कराळे पाटील, सदाशिव बोत्रे, बाळासाहेब कराळे पाटील, उपसरपंच नितीन ताठे, तानाजी कराळे,गोरख गाडे, मा. सरपंच ह भ प लक्ष्मणराव कराळे पाटील,विठ्ठल ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Alandi : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरती श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान आणि कराळे पाटील परिवार सुदवडी यांच्या वतीने रामायनाचार्य ह.भ.प. उद्धव महाराज अटाळीकर विदर्भ यांच्या राम कथेचे आयोजन करण्यात ( Maval) आले होते.

श्रीमती भामाबाई बोत्रे यांनी आपल्या जीवनात भंडारा डोंगर उतारावर सागाच्या झाडांची लागवड केली जंगली झाडांची लागवड केली.अत्यंत कष्टमय जीवन परंतु तुकाराम महाराजांवर खूप श्रद्धा सुदवडी ते भंडारा डोंगर प्रत्येक महिन्याच्या दशमीला त्यांची वारी असायची. आता वृद्धपकाळामुळे त्यांना ते शक्य होत नाही इथून पुढे त्यांना निरोगी आयुष्य मिळो अशा भावना व्यक्त केल्या. कराळे पाटील परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब कराळे पाटील,अजित कराळे पाटील, विठ्ठल कराळे, निलेश कराळे,निखिल कराळे, संकेत कराळे, नितीन शिंदे, रमेश कराळे, सुधीर कराळे यांनी केले.

प्रास्ताविक राहुल कराळे यांनी केले सूत्रसंचालन ढमाले मामा यांनी केले. सर्वांचे आभार शांताराम कराळे पाटील यांनी ( Maval) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.