रुपासरीवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोळीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत होते. रुपासरी हा अमजद हसमत अली सय्यद उर्फ सनी उर्फ फैयज (वय-48, सांताक्रुज इस्ट, मुंबई) याच्या मदतीने मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे माहिती मिळाली होती. यानंतर अमजद हसमत अली सय्यद हा दुबईला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर दोन पथके पाठवून अमजद सय्यद याला दुबईला पळून जात असतांना मिरा भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याला  असे अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे जानेवारी महिन्यात कारवाई करून 25 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार विशाल शिंदे, योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी आदींच्या पथकाने केली.