Pune : धानोरी-विमाननगर परिसराचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – होळकर जलशुद्धिकरण केंद्र ते विद्यानगर पंपिंग स्टेशनला जोडणारी मुख्य जलवाहिनीला नदीपात्रात गळतीमुळे विद्यानगर पंपिंग स्टेशनअंतर्गत येणा-या कळस, धानोरी, विमाननगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी या भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी दिली आहे.

ही जलवाहिनी सोमवारी (8) सायंकाळपर्यंत दुरुस्त होईन. त्यानंतर या परिसराचा पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईन. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.