Pune : खडकवासला धरणातून उद्या 1700 क्यूसेक पाणी सोडणार

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून उद्या पहाटे 1700 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता पी बी शेलार यांनी दिली आहे.

खडकवासला धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. पावसाच्या हजेरीमुळे धरण 95 टक्के भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळी धरणातून 500 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. धरण क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे उद्या पहाटे धरणातून 1700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सावधानता बाळगण्याचा इशाला देण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.