Industrial Training Institute : महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे मुलींसाठी स्वतंत्र औद्यागिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institute) सुरु करण्यात आली आहे. चालू वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुरुवार (दि.1) पासून नियमित प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यानिमीत्त विद्यार्थ्याचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आणि प्राचार्य शशिकांत पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक प्रकाश घोडके, ज्योत सोनावणे, शर्मिला काराबळे, निदेशक मनसरा कुमावणी, वंदना चिंचवडे, हेमाली कोंडे, सोनाली नीलवर्ण, बबिता गावंडे, योगिता कोठावदे, सीमा जाधव, सिद्धार्थ कांबळे, पूनम गलांडे, वृंदावणी बोरसे, मनोज ढेरंगे, राजकुमार तिकोणे, मंगेश कलापुरे आदी उपस्थित होते.

Pune E-Bus Depot : वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री शिंदे

यावेळी बोलताना (Industrial Training Institute) उल्हास जगताप म्हणाले की, औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमधील उद्योगांना कुशल मनुष्यबळाची सातत्याने आवश्यकता भासत असते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून असे प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ तयार केले जात असून या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रशिक्षण घेतल्यास त्यांना निश्चितपणे रोजगार आणि स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी प्राप्त होईल. यावेळी प्राचार्य शशिकांत पाटील यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गटनिदेशक विजय आगम यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.