Pune news : पुण्यात नवीन बांधकाम परवान्यांना आता वाहन चार्जींग सुविधेची अट

एमपीसी न्यूज : पुण्यात नवीन बांधकाम परवानगी घेताना आता वाहन चार्जींग पॉईंटची अट घातली जाणार आहे.(Pune news)  ही अट 15 सप्टेंबर 2022 पासून दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवान्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. अतिरीक्त विद्यूत लोड विद्युत महामंडळाकडून याची मान्यता आता बांधकाम व्यावसायिकांना घ्यावी लागणार आहे, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

नवीन इमारतीमध्ये 20 पेक्षा अधिक चारचाकी वाहनांचे अचल पार्कींग (Immovable Parking) असल्यास एकूण पार्कींगच्या 20 टक्के पार्कींगसाठी इलेक्ट्रीकल चार्जींग पाँईट ठेवण्यात यावे. तसेच या 20 टक्के पैकी 20 किंवा 30 टक्के क्षेत्र हे सामाईक इलेक्ट्रीक चार्जींगसाठी ठेवण्यात यावे असे महापालिकेच्या परिपत्रकांत म्हटले आहे.(Pune news) तसेच नवीन  व्यावसायिक, शैक्षणीक संस्था, शॉपींग मॉल्स, मल्टीप्लेक्स, हॉटेल्स, हॉस्पिटल, आय.टी.पार्क यांना बांधकामाच्या प्रस्तावात जर 50 पेक्षा जास्त अचल पार्कींग असेल तर एकूण पार्कींगच्या 25 टक्के पार्कींग ही इलेक्ट्रीक वाहनांसाठी राखीव ठेऊन, त्यांच्या चार्जींगसाठी आवश्यक ती सुविधा करत अतिरीक्त इलेक्ट्रीक लोडसाठी विद्यूत महामंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Pune E-Bus Depot : वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री शिंदे

याबरोबरच केवळ नवीनच नाही तर सध्या चालू असलेल्या शैक्षणीक संस्था, शॉपींग मॉल्स, म्लटीप्लेक्स, हॉटेल्स, हॉस्पीटल्स, आयटी पार्क यांनाही 50 पेक्षा जास्त पार्कींग (Pune news) असेल तर एकूण पार्कींगच्या 10 टक्के पार्कींग ही इलेक्ट्रिक वाहनांना चार्जींगसाठी सुसज्ज करून ठेवावी लागणार आहे.

यासाठी भारत सरकारने 14 जानेवारी 2022 रोजी नियमावली सांगतली आहे. त्यानुसार 30 टक्के सामाईक पार्किंग क्षेत्र हे ईव्ही (ईलेक्ट्रीक व्हेईकल) साठी राखीव ठेवावे लागणार आहे.(Pune news) यासाठी ईव्हीच्या मार्गदर्शक तत्वानुसार 1 एसी स्लो चार्जर हा 3 ईव्ही च्या समतुल्य असेल तर 1 फास्ट चार्जर हा 10 ईव्ही साठी समतुल्य असणार आहे यांची सुविधा करावी लागणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेत परवाना घेताना अटीची पुर्तता करून घ्यावी असे आवाहन आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.