Pune : 14 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज : पुण्याच्या (Pune) धायरी परिसरातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका 14 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. प्रणव रोहिदास निवंगुणे (वय 14 वर्षे, रा. निवृत्ती नगर, चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास
हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, धायरी येथील चरवड वस्ती येथे येथे प्रणव आपल्या कुटुंबासोबत राहतो. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तो घरातील पाण्याची मोटर चालू करण्याकरिता गेला होता. विद्युत मोटार चालू केल्यानंतर मोटारीचा विद्युतप्रवाह लोखंडी जिन्यात उतरला. दरम्यान प्रणवचा जिन्याला धक्का लागल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला. या विजेच्या धक्क्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Pune news : पुण्यात नवीन बांधकाम परवान्यांना आता वाहन चार्जींग सुविधेची अट

याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Pune) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव हा काशिनाथ खुटवड मेमोरियल स्कूल आंबेगाव बुद्रुक येथे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.