Pune Drown Case : पोहण्यासाठी गेला अन् चिखलात फसला, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज –  बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा गाळात रुतल्याने (Pune Drown Case) दुर्दैवी मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील काशीग गावच्या हाद्दीत फार्महाऊसवर शिवम सूर्यकांत पाटील ( रा. डोंबिवली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की शिवम पाटील हा मूळचा डोंबिवली येथील रहिवासी आहे. आपल्या काही मित्रांसोबत तो मुळशी तालुक्यातील काशीग गावच्या हाद्दीत फार्महाऊसवर आला होता. शनिवारी संध्याकाळी जवळच असलेल्या हाडशी बंधाऱ्यावर शिवम त्याच्या एका मित्रासोबत पोहण्यासाठी गेला होता. दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता पोहताना शिवम पाण्याखाली चिखलात रुतला. (Pune Drown Case)

Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाईन 3 तर्फे ताथवडे कास्टींग यार्ड येथे ‘इको संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

दरम्यान सोबत असलेल्या मित्राला तो पोहताना कुठेच दिसेना म्हणून त्याने जवळच असलेल्या इतर मित्रांना त्याची कल्पना दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थना याची माहिती देण्यात आली,परंतु रात्री अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी रविवारी सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केले आणि अखेर शिवम पाटील याचा मृतदेहच हाती लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.