दहावीनंतर पुढे काय ? चिकित्सक विचार कौशल्य विकसित करण्यासाठी…(भाग पाचवा)

एमपीसी न्यूज- जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करियर निवडीची. कोणते करियर निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करियरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते तर चुकीचे करियर निवडल्यास विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्वाची वर्षे वाया जातात. म्हणूनच एमपीसी न्यूज घेऊन येत आहे करियर निवडीवर मार्गदर्शन करणारी मालिका ‘दहावीनंतर पुढे काय ?’ यामध्ये मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक डॉ. समिता प्रशांत चव्हाण या मार्गदर्शन करणार आहेत.

चिकित्सक विचार कौशल्य विकसित करण्यासाठी जाणिवपूर्वक काही प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांमध्ये या कौशल्याचा विकास होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वयंपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होऊ शकते. त्यासाठी चौफेर वाचनही आवश्यक असते. आपल्या मुलांना बसवून सारासार विचार करण्याची सवय लावणे, प्रत्येक गोष्टीतील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाबींचा तुलनात्मक अभ्यास करायची सवय लावणे, कुठल्याही गोष्टीवर व विशेषतः सोशल मीडिया आणि इंटरनेट या माध्यमातून दिसणाऱ्या गोष्टींवर लगेच विश्वास न ठेवता त्यावर विचार करून मगच विश्वास ठेवण्याची सवय लावणे गरजेचे आहे. म्हणूनच चिकित्सक विचार कौशल्य विकसित करणे काळाची गरज आहे, नाहीतर तुम्ही भरकटत रहाल.

स्वतःचे विचार व कृती यांचे पृथक्करण करण्याची सवय लावणे गरजेचे आहे. आपण स्वतः बद्दल काय विचार करतो, याबरोबर इतरांचे आपल्याविषयी काय मत आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आत्मपरीक्षणाच्या छोट्या छोट्या सवयी लावल्यास हे साध्य होते. प्रत्येक कृती करण्यापूर्वी’ ‘मी काय करतो आहे, ‘ मी हे का करतो आहे, ‘ ‘माझ्या हे करण्याने माझ्यावर आणि इतरांवर काय परिणाम होणार आहे.’ यासारखे प्रश्न विचारायला लावा. विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांबरोबर शिक्षकांचाही तितकाच महत्वाचा सहभाग असतो. सर्व ‘रेडी ‘ द्यायच्या आजच्या काळात विद्यार्थ्यांना स्वतः ला समजून घेण्याची सवय लावणे गरजेचे आहे. यासाठी चिंतन, मनन करण्याची प्रवृत्ती ही अशी चिकित्सक विचारशक्ती विकसित करण्यास नक्कीच उपयुक्त ठरू शकते. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी त्याचबरोबरीने विद्यार्थी आणि विद्यार्थी यांच्या संवादाकडे चांगले लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना मोकळेपणाने प्रश्न विचारायला प्रवृत्त करावे.

(समाप्त)

चिकित्सक विचार वृद्धीसाठी
1. वस्तुनिष्टपणे विश्लेषण व परीक्षण:- माहितीचे किंवा घटनेचे वस्तुनिष्टपणे विश्लेषण व परीक्षण करणे.
2. ब्रेन स्टोर्मिंग:- कोणत्याही घटनेवर, समस्येवर आधारित डोक्यात येणारे सर्व विचार लक्षात घेणे. सद्सदविवेकबुद्धी, वस्तुनिष्ठता व वैज्ञानिक दृष्टिकोनातून समस्या सोडविण्यासाठी याचा विचार करावा.
3. चिंतन-मनन:- माहितीचे किंवा घटनेचे वस्तुनिष्टपणे चिंतन-मनन करावे.
4. सखोल विचार:- एखाद्या मुद्द्याच्या बाबत खोलात जाऊन विचार करणे. निबंध लेखनात अशी विचारांची सखोलता उपयुक्त ठरते.
5. सर्व बाजुंचा विचार:- एखाद्या समस्येवर चौफेर विचार करावा.
6. प्रयोगशीलता:- कोणताही विचार मांडण्यापूर्वी प्रयोग करून पाहणे आवश्यक असते. प्रयोग करायचा म्हणजेच चिकित्सक विचार आलाच.

मार्गदर्शक-
डॉ. समिता प्रशांत चव्हाण
मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक
पत्ता-
संकल्प: ए सेंटर फॉर कॉम्पिटेन्सी असेसमेन्ट
322, गुरूदत्त अपार्टमेंट, दुसरा मजला, विठ्ठल मंदिर जवळ, नवी पेठ, पुणे-३०
मो.- 7028896981/82

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.