Sport News : पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी

एमपीसी न्यूज – स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी – 20 क्रिकेट स्पर्धेत पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने तिसरा तर, स्टॅलियन्स् क्रिकेट क्लबने आपापल्या प्रतिस्पर्धींचा पराभव करून दुसरा विजय मिळवला.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रसाद कुंटे याच्या नाबाद 87 धावांच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने ब्राईट इलेव्हन क्लबचा 4 गडी राखून पराभव केला.पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्राईट इलेव्हन क्लबने 20 षटकात 183 धावांचे आव्हान उभे केले.मिहीर ओक (62 धावा), कौशिक देशपांडे (41 धावा) आणि सिद्धार्थ जोशी (30 धावा) यांनी धावांचे योगदान दिले. हे आव्हान पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने 17.5 षटकात व 6 गडी गमावून पूर्ण केले. प्रसाद कुंटे याने 39 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 87 धावा फटकावल्या.निखिल नसेरी (29 धावा) आणि परवेझ पटेल (27 धावा) यांनी दुसर्‍या बाजुने साथ देत संघाचा विजय सोपा केला.

नितिश सप्रे याच्या फलंदाजीच्या जोरावर स्टॅलियन्स् क्रिकेट क्लबने स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लबचा 69 धावांनी पराभव केला.स्टॅलियन्स् क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा धावफलकांवर लावल्या. नितीश सप्रे (71 धावा), सुवरा भादुरी (नाबाद 57 धावा) आणि गीत देसाई (49 धावा) यांनी संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला.त्याला उत्तर देताना स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लबचा डाव 142 धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी :
ब्राईट इलेव्हन क्लब : 20 षटकात 8 गडी बाद 183 धावा (मिहीर ओक 62 (33, 2 चौकार, 8 षटकार), कौशिक देशपांडे 41, सिद्धार्थ जोशी 30, कपिल कुर्लेकर 2 – 35) पराभूत वि. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब : 17.5 षटकात 6 गडी बाद 184 धावा (प्रसाद कुंटे नाबाद 87 (39, 10 चौकार, 4 षटकार), निखील नसेरी 29, परवेझ पटेल 27, नितीन श्रीनिवास 2 – 23); सामनावीरः प्रसाद कुंटे;

स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब : 20 षटकात 3 गडी बाद 211 (नितीश सप्रे 71 (50, 8 चौकार, 1 षटकार), सुवरा भादुरी नाबाद 57 (32, 7 चौकार, 2 षटकार), गीत देसाई 49 (27, 4 चौकार, 3 षटकार),  सुरज दुबल 22) वि.वि. स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लब : 18.2 षटकात 10 गडी बाद 142 धावा (विराज सी. 33, बंटी 31, प्रशांत दळवी 4 – 46); सामनावीर : नितिश सप्रे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.