Crime News : महिलेचा विनयभंग करून भावास मारहाणप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – एका महिलेचा विनयभंग करून तिच्या भावास शिवीगाळ करून मारहाण करून व पोलीस असल्याची खोटी बतावणी करून तोतयागिरी करणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.प्रसन्न टेळे (वय 27रा. कोथरूड मूळ सोलापूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.ही घटना काटेपुरम चौकाजवळ पिंपळे गुरवमध्ये रात्री 10:20 ते 10:30 वा चे दरम्यान घडली आहे.

आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला.फिर्यादी त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर जिन्याने जात असताना त्यांच्या मागून येऊन  काही कारण नसताना शिवीगाळ केली.आरोपीने फिर्यादी यांच्या उजव्या हाताला पकडून, त्यांच्या शरीराला स्पर्श करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न केली. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या त्यांच्या भावासही शिवीगाळ करुन हाताने मारहाण करीत उजव्या हाताला चावा घेतला.तसेच पोलिस असल्याची खोटी बतावणी करीत तोतयागिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.