World Cup 2023 : घोट्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याला मुकणार

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार (World Cup 2023) व अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 22 तारखेला धरमशाला येथे होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात खेळणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांनी दिली आहे.

पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात 9 व्या षटकात गोलंदाजी करताना फलंदाजाने लगावलेला चेंडू पायाने अडवण्याच्या प्रयत्नात तो पायावर कोसळला होता. त्या दरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला चालण्यास अडचण जाणवल्यामुळे मैदानाच्या बाहेर जावे लागले होते. त्या षटकातील पुढील चेंडू शतकवीर विराट कोहलीने टाकले होते.

Chinchwad : श्रीलंका आणि पीसीईटीमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

दरम्यान, त्याच्या दुखापतीच्या घोट्याच्या स्कॅननंतर, हार्दिकला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे हार्दिक बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या सतत देखरेखीखाली असणार आहे.

20 ऑक्टोबरला तो संघासोबत धरमशाला येथे जाणार नाही. त्यामुळे हार्दिकला न्युझीलंड विरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार (World Cup 2023) आहे. त्याच्या जागेवर कोणाला न्युझीलंड विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल हे पाहणे महत्वाचे आहे. तथापि, हार्दिक थेट लखनऊ येथे टीममध्ये सामील होणार असून जिथे 29 ऑक्टोबरला भारत इंग्लंड विरुद्ध सामना खेळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.