U-19 Asia cup 2023 : अंडर-19 आशिया चषक 2023 साठी 15 सदस्यीय संघ जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया चषक 2023 साठी 15 सदस्यीय संघ (U-19 Asia cup 2023) जाहीर केला आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुबईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

भारतीय संघ अंडर-19 आशिया कपचा गतविजेता आहे. म्हणजेच याआधी गेल्या मोसमात भारताने विजेतेपद पटकावले होते. भारताचा अंडर-19 संघ हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. अंडर-19 भारतीय संघाने आजवर सर्वाधिक 8 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत.

यावेळी, 2023 आशिया चषक स्पर्धेसाठी कनिष्ठ क्रिकेट समितीने 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. संघात तीन प्रवासी स्टँडबाय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय संघातील चार राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली आहे, जे संघासोबत दुबईला जाणार नाहीत.

Pimpri : राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याची गरज – अरुण बोऱ्हाडे

अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारताचा 15 सदस्यीय संघ – U-19 Asia cup 2023 :

उदय सहारण (कर्णधार), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, धनुष गौडा, अविनाश राव (विकेटकीपर), एम. अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), आर्ध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

स्टँडबाय खेळाडू-

प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.

4 राखीव खेळाडू जे संघासोबत गेले नाहीत –

दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.