Pimpri : राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याची गरज – अरुण बोऱ्हाडे

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण यांना (Pimpri) शालेय वयापासूनच सामाजिक भान आणि राष्ट्रभक्तीची जाण आलेली होती. त्यामुळेच त्यांनी शालेय वयातच स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिले आणि जन्मभर निःस्वार्थपणे देशाची सेवा केली. हीच राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याची आज आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे अध्यक्षस्थानी होते.

बोऱ्हाडे पुढे म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम राबविताना त्यांनी कृषी औद्योगिक, शैक्षणिक, याबरोबरच (Pimpri) साहित्य, कला संस्कृती यावरही भर दिला. त्यांनी आखून दिलेल्या पायावरच आजचा महाराष्ट्र घडला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तबगारीची मोहोर उमटविली आहे, गव्हाणे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक विकासला त्यांनी चालना दिली म्हणून हे शहर नावारूपाला आले आहे. संविधान दिनानिमित्त ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी संविधानातील प्रस्ताविकेचे वाचन केले.

Pimpri : माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, महिला कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गंध, खजिनदार दीपक साकोरे, उपाध्यक्ष संदीपान झोंबाडे, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष लाल मोहंम्मद चौधरी, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, गोरोबा गुजर, युवक सरचिटणीस निखिल घाडगे, सरचिटणीस बी.के.कांबळे, उपाध्यक्ष रामकिसन माने, महिला उपाध्यक्षा विजया काटे, खंडू पवार, उपाध्यक्ष कुमार कांबळे, उपाध्यक्ष संपतराव पाचुंदकर, शौल कांबळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनील अडागळे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.