Pimpri : माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण हे (Pimpri) भारताचे माजी उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तर होतेच शिवाय ते उत्कृष्ट संसदपटू आणि मुत्सदी राजकारणीही होते, त्यांनी अनेक सहकार चळवळींपासून सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील योगदान दिले असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी उपपंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, वल्लभनगर तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास (Pimpri) अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

Pune : चार ज्येष्ठ तरुण पार करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्ज्वला आंदुरकर, प्रभारी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे, आरोग्य मुकादम मोहन वाघमारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.