World Update: दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी नवीन मृतांच्या संख्येत घट, कोरोनामुक्तांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात

कोरोनाबाधितांची संख्या एकूण संख्या 21 लाख 81 हजार 308 तर मृतांचा आकडा 1 लाख 45 हजार 470 वर

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित मृतांच्या एका दिवसातील संख्येच्या आलेखाने गेले दोन दिवस उसळी घेतली होती, मात्र काल मृतांची संख्या तुलनेत कमी राहिल्याने आलेख पुन्हा खाली आला आहे. त्यातच कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही साडेपाच लाखांच्या घरात पोहचली आहे, या बाबी त्यातल्या त्यात दिलासा देणाऱ्या आहेत.

कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने पाच दिवस घसरलेल्या आलेखाने मागील दोन दिवस पुन्हा वरच्या दिशेने झेप घेतल्याने संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली होती. जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21 लाख 81 हजार 308 वर जाऊन पोहचली असून कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 लाख 45 हजार 470 इतका झाला आहे. काल (गुरुवारी) एका दिवसात कोरोनाचे 95 हजार 22 नवे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा हा आतापर्यंतचा सर्वांत जास्त आकडा आहे. दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 996 इतकी आहे. हा आकडा मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घसरल्याचे पाहायला मिळत आहे. 

आतापर्यंत 5 लाख 47 हजार 069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 14 लाख 88 हजार 769 इतके सक्रिय असून त्यापैकी 14 लाख 32 हजार 793 रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 56 हजार 588 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

सलग पाच दिवसांतील जगातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू या दोन्हींच्या वाढीचा वेग मंदावत असतानाच. 14 व 15 एप्रिलला पुन्हा त्यात लक्षणीय वाढ झाली होती. काल त्यापैकी एका दिवसातील मृतांचा आकडा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठ दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

9 एप्रिल –  नवे रुग्ण 85 हजार 638 ,  दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 274

10 एप्रिल –  नवे रुग्ण 94 हजार 629,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 973

11 एप्रिल –  नवे रुग्ण 80 हजार 961,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 092

12 एप्रिल –  नवे रुग्ण 72 हजार 523   दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 415

13 एप्रिल – नवे रुग्ण 71 हजार 591     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 423

14 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 966     दिवसभरातील मृतांची संख्या 10 हजार 761

15 एप्रिल – नवे रुग्ण 84 हजार 515     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 959

16 एप्रिल – नवे रुग्ण 95 हजार 22       दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 996

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 6,77,570 (+29,567), मृत 34,617 (+2,174)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 1,84,948 (+4,289), मृत 19,315 (+503)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,68,941 (+3,786), मृत 22,170 (+525)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,65,027 (+17,164), मृत 17,920 (+753)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,37,698 (+2,945), मृत 4,052 (+248)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 1,03,093 (+4,617), मृत 13,729 (+861)
  7. चीन – कोरोनाबाधित 82,341 (+46), मृत 3,342 (+0)
  8. इराण – कोरोनाबाधित 77,995 (+1,606), मृत 4,869 (+92)
  9. टर्की – कोरोनाबाधित 74,193 (+4,801), मृत 1,643 (+125)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 34,809 (+1,236), मृत 4,857 (+417)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 30,683 (+2,073), मृत 1,947 (+190)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 30,106 (+1,727), मृत 1,195 (+185) 
  13. नेदरलँड – कोरोनाबाधित 29,214 (+1,061) , मृत 3,315 (+181)
  14. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 26,732 (+396), मृत 1,281 (+42)
  15. रशिया – कोरोनाबाधित 27,938 (+3,448), मृत 232 (+34)
  16. स्वित्झर्लंडकोरोनाबाधित 26,732 (+396), मृत 1,281 (+42)
  17. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 18,841 (+750), मृत 629 (+30)
  18.  ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,476 (+126), मृत 410 (+17)
  19. भारत – कोरोनाबाधित 13,430 (+1,060) , मृत 448 (+26)
  20. आयर्लंडकोरोनाबाधित 13,271 (+724) , मृत 486 (+42) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.