Pimpri : निगडी-प्राधिकरणमध्ये योग साधना शिबिर

एंमपीसी न्यूज – योग विद्या गुरुकुल – त्र्यंबकेश्वर नाशिक, योग विद्या धाम पिंपरी-चिंचवड आणि रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने षटचक्र ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  अशी माहिती  रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्य यांनी दिली.

षटचक्र ध्यान साधना शिबिर आज (सोमवार, दि. 12) पासून ते रविवार (दि. 18) पर्यंत दररोज सकाळी सहा ते साडे सात आणि साडे सहा ते आठ पर्यंत निगडी प्राधिकरण येथील पूर्णब्रम्ह हॉल, सावरकर सदन याठिकाणी होणार आहे. या शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जाहीर केलेल्या पंतप्रधान योग पुरस्काराचे मानकरी ऋषिधर्मज्योती योगाचार्य डॉ. विश्वास मंडलीक हे योगाबद्दल मार्गदर्शन करणार आहे. शिबिराच्या उदघाटन समारंभासाठी रो सतीश आचार्य, डॉ. महेश पाटील, मेघना मोकाशी उपस्थित होते.

या शिबिरासाठी एक हजार रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. प्रवेश फी च्या माध्यमातून जमा होणारा निधी पिंपरी-चिंचवडमध्ये योग विद्या ध्यान मंदिर उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.