Pimpri : तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या तरुणाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कोयत्याने मारहाण करण्यात आली. त्याच्याजवळील 6 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री अकराच्या सुमारास नेहरू नगर स्टेडियमजवळ घडली.

कमलेश चव्हाण (वय 21, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) या तरुणाने या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अनोळखी जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश शुक्रवारी रात्री चिंचवड येथे जेवणासाठी गेला होता. रात्रीचे जेवण करून तो संत तुकाराम नगर येथील आपल्या घरी येत होता. पिंपरीमधील नेहरू स्टेडियम जवळ पायी आला असता अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कमलेश याला अडविले. त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले कोयत्याने त्याला मारहाण केली. त्याच्याजवळ असलेले 1 हजार 500 रुपये आणि मोबाईल फोन असा एकूण 6 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.