Dapodi : पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार केले. ही घटना दापोडी येथे मंगळवारी (दि. 5) रात्री घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नूर बदन कारी (वय 30), नूर याचा भाऊ, संतोष किसन अडागळे (वय 25), सतीश किसन अडागळे (वय 28, सर्व रा. पवार वस्ती, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गणेश विष्णू अडागळे (वय 25, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे मागील काही दिवसांपूर्वी आरोपी कारी याचा भाऊ, आरोपी संतोष आणि सतीश यांच्यासोबत किरकोळ कारणांवरून भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना सुरुवातीला हाताने, त्यानंतर लाकडी दांडक्‍याने त्यानंतर कोयत्याने वार करीत मारहाण केली. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.