Lonavala : लायन्स पाॅईटच्या दरीत पडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : लोणावळा शहराजवळील (Lonavala) लायन्स पाॅईट या ठिकाणाहून काल सुमारे 600 ते 700 फुट खोल दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम शिवदुर्ग रेस्कू पथकाच्या सहाय्याने सुरु आहे. सदरचा मृतदेह दरीत शोधण्यात पथकाला यश आले असून त्याला रोप च्या सहाय्याने वर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Mhalunge : जीवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात मागितले गौण खनिज

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत लायन्स पाॅईट आहे. काल याठिकाणाहून सदरचा युवक दरीत पडला होता. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांना व आज सकाळच्या सुमारास शिवदुर्ग रेस्कू पथकाला माहिती समजल्यानंतर शिवदुर्गची टिम घटनास्थळी दाखल झाली. (Lonavala) रोप च्या सहाय्याने टिम मधील काही सदस्य दरीत उतरत त्यांनी शोध मोहिम राबवत पडलेल्या तरुणाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला आहे. सध्या हा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.