Youth drown : आईच्या डोळ्यासमोरच तरुणाचा दुर्दैवी अंत; पोहता पोहता क-हा नदी पात्रात अचानक नाहीसा झाला

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. का-हाटी येथील क-हा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.(Youth drown) आईच्या डोळ्यासमोरच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम संतोष खंडागळे (वय 20) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शुभम आईसह गोधडी धुण्यासाठी नदीवर आला होता. गोधडी धुतल्यानंतर तो मित्रांसह पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला.(Youth drown) मात्र पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम बुडू लागला. शुभम बुडत असल्याचे पाहून त्याच्या आईने आणि इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत नदीत उडी मारून त्याला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यात बुडून शुभम चा मृत्यू झाला होता.

Free cycle distribution : चांदुस विद्यालय येथे 25 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

शुभम कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. सातारा येथील पोलीस भरती अकॅडमी तो शिक्षण घेत होता. सुट्टी असल्याने तो गावी आला होता. परंतु त्याच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली..(Youth drown) त्याच्या मृत्यूने संपूर्ण बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.