Today’s Horoscope 27 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 September 2022
मंगळवार.
तारीख 27.09.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- चित्रा.
चंद्र राशी- कन्या 18.18 पर्यंत नंतर तुळ.
————————————–
मेष – शुभ रंग- पिस्ता
आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोक वर काढण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. आज प्रवासात मात्र सावध राहा.

वृषभ- शुभ रंग- क्रीम
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल असेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

मिथुन- शुभ रंग- सोनेरी
कौटुंबिक सदस्यांमध्ये असलेला सुसंवाद हा तुमच्या घराबाहेर कामातील उत्साह वाढवेल. आज गृहिणींना माहेरची ओढ लागेल. कला क्रीडा क्षेत्रात मेहनत वाढवावी लागणार आहे.

कर्क- *शुभ रंग- पांढरा
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आईच्या तब्येतीची विचारपूस नक्कीच करा. घराबाहेर वाद टाळा.

सिंह -शुभ रंग- मोतिया – Today’s Horoscope 27 September 2022
आज तुमचे मनोबल उत्तम असेल कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. मुले अभ्यासाचा कंटाळा करतील.

कन्या- शुभ रंग- डाळिंबी
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकाल. महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. आपले मत मांडण्याची घाई नको.

तूळ- शुभरंग- सोनेरी
आज कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. घरात वडीलधाऱ्यांचे मूड ही सांभाळावे लागणार आहेत. आज दूरच्या प्रवासात बेसावध राहू नका. दुपारनंतर काही महत्वाचे समाचार येतील.

वृश्चिक- शुभ रंग- निळा
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र मैत्रिणींच्या सहवासात आजचा दिवस आनंदात घालवाल.

धनु- शुभ रंग- चंदेरी
नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज तुम्हाला कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल.

मकर- शुभ रंग – राखाडी
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. आत्मविश्वासाचा अतिरेकही नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. जेष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

कुंभ- शुभरंग- आकाशी
कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद होतील. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागले तरीही फार आवाज होणार नाही याची काळजी घ्या.

मीन- शुभरंग- क्रीम
आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आज वैवाहिक जोडीदाराशी तुमचे चांगले सुर जुळतील.

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Youth drown : आईच्या डोळ्यासमोरच तरुणाचा दुर्दैवी अंत; पोहता पोहता क-हा नदी पात्रात अचानक नाहीसा झाला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.