Pune : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाची निघृण हत्या; वर्षभरानंतर गुन्हा दाखल.

एमपीसी न्यूज – प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाची पत्नीच्या नातेवाईकांनी हत्या केल्याचा ऑनर किलिंगचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गेल्या वर्षी लोहगाव येथे 19 व 20 जुलै 2017 या कालावधीमध्ये ही घटना घडली होती. वर्षभरानंतर पोलीसांनी दोघांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. इंद्रजीत उमाशंकर गौड (वय 21, राहणार लोहगाव, पुणे) असं नातेवाईकांचा विरोध पत्कारुन प्रेम विवाह करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

इंद्रजितच्या पत्नीचे मामा कमलेश मल्लू गौड आणि चुलतभाऊ अमरनाथ दशरथ गौड (मदनपुरा, उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हत्तेचा प्रकार उघडकीस आल्यावर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनात इंद्रजीत याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आता वर्षभरानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित उमाशंकर गौड याने नातेवाईकांचा विरोध पत्करुन प्रेम विवाह केला होता. त्यामुळे त्याचा पत्नीचे मामा आणि चुलत भाऊ जास्त नाराज होते. इंद्रजीतला धडा शिकविण्याचा त्यांनी विचार केला. 19 जुलैच्या रात्री ते दोघे त्याच्या घरी गेले आणि त्यांनी इंद्रजीतला जबर मारहाण करत गळा दाबून त्याची हत्या केली गेली.
डॉक्टरांकडून शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला मात्र इतके दिवस त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या शवविच्छेदन अहवालात अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा तपास केल्यानंतर आता शवविच्छेदन अहवालावरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी सध्या फरार आरोपींचा शोध चालू आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.