Pimpri : संघर्ष समितीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी आनंदा कुदळे यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर ओबीसी संघर्ष समिती समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पिंपरी येथे आयोजित करण्यात आली. या सभेत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी आनंदा कुदळे यांची फेरनिवड करण्यात आली.

यावेळी नगरसेवक वसंत लोंढे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी सभापती चेतन भुजबळ, माजी नगरसेवक हरीभाऊ तिकोणे, माजी नगरसेवक बन्सी पारडे, चंद्रकांत डोके आदी उपस्थित होते

ओबीसी संघर्ष समितीच्या पिंपरी-चिंचवड शहर चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी विजय दर्शले व महिला अध्यक्षपदी निलिमा भागवत यांची बिनविरोध निवड झाली. पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी गणेश ढाकणे व महिला अध्यक्षपदी नंदा करे यांची बिनविरोध निवड झाली तर भोसरी विधानसभा अध्यक्षपदी सोपान घोलप व महिला अध्यक्षपदी महादेवी याला यांची बिनविरोध निवड झाली.सूत्रसंचालन विशाल जाधव यांनी केले. प्रास्ताविक ईश्वर कुदळे यांनी केले. आभार अॅड चंद्रशेखर भुजबळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.