११ सप्टेंबर : दिनविशेष

What Happened on September 11, What happened on this day in history, September 11. See what historical events occurred, which famous people were born and who died on September 11.

११ सप्टेंबर : दिनविशेष

११ सप्टेंबर – महत्वाच्या घटना

  • १२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
  • १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
  • १७९२: होप हिरा चोरला गेला.
  • १८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
  • १९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
  • १९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
  • १९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
  • १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
  • १९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
  • १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
  • १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
  • १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
  • २००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
  • २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

११ सप्टेंबर– जन्म

  • १८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.
  • १८६२: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.
  • १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)
  • १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)
  • १८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)
  • १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)
  • १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)
  • १९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)
  • १९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)
  • १९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.
  • १९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.
  • १९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.

११ सप्टेंबर– मृत्यू

  • १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.
  • १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)
  • १९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)
  • १९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
  • १९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)
  • १९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.
  • १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.
  • १९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.
  • १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)
  • १९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.
  • १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)
  • २०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.