१० सप्टेंबर : दिनविशेष

What Happened on September 10, What happened on this day in history, September 10. See what historical events occurred, which famous people were born and who died on September 10.

१० सप्टेंबर : दिनविशेष जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

१० सप्टेंबर – महत्वाच्या घटना

  • १८४६: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.
  • १८९८: लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
  • १९३६: प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.
  • १९३९: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
  • १९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
  • १९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
  • १९७५: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
  • १९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.
  • २००१: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
  • २००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.

१० सप्टेंबर– जन्म

  • १८७२: कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)
  • १८८७: स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९६१)
  • १८९२: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.
  • १८९५: कविसम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.
  • १९१२: भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २००२)
  • १९४८: नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)
  • १९८९: भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म.

१० सप्टेंबर– मृत्यू

  • इ.स.पू. २१०: चीनची पहिले सम्राट किन शी हुआंग यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी २५९)
  • १९००: महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.
  • १९२३: बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)
  • १९४८: बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचे निधन.
  • १९६४: व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.
  • १९७५: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.
  • १९८३: नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.
  • २०००: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२१)
  • २००६: टोंगाचा राजा टॉफाहाऊ टुपोऊ यांचे निधन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.