Pimpri : राज्यस्तरीय ऐरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचे नेत्रदीपक यश

एमपीसी न्यूज- बीड येथे झालेल्या 20 व्या राज्यस्तरीय ऐरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत वृंदा सुतार हिने वैयक्तिक महिला या विभागात 14 वर्षाखालील वयोगटात रौप्य पदक मिळवले. राज्यस्तरावर खेळणारी वृंदा सुतार ही प्रथमच आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. मागील चार वर्षात ऐरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर राज्याचे नेतृत्व करणारी पिंपरी- चिंचवड मधील ती पहिली खेळाडू ठरली आहे.

क्लबतर्फे 11 वर्षातील वयोगटात वैयक्तिक पुरुष प्रकारात अद्वैत खांबेटे याने 6 वा, तर परीजा क्षीरसागर हिने वैयक्तिक गटामध्ये कास्यपदक पटकावले.

14 वर्ष वयोगटात वैयक्तिक महिला प्रकारात निधी असबे हिने 5 वे स्थान पटकावले. अद्वैत खांबेटे व परीजा क्षीरसागर यांच्या मिश्रदुहेरी ने 11 वर्षातील वयोगटात 4 था क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे 17 वर्षाखालील गटामध्ये रूजुला देवघरे व प्रणित आढाव यांच्या मिश्रदुहेरी ने 17 वर्षातील वयोगटात कास्यपदक पटकावले. पंच म्हणून क्षितिजा राऊत यांनी केले तर प्रशिक्षक म्हणून हर्षद कुलकर्णी यांनी काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.