Dapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना दापोडी येथे घडली.

अमित कांबळे (वय 27), स्वप्नील परदेशी (दोघेही रा. दापोडी) आणि छोट्या दराडे (वय 27, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कुणाल बाळासाहेब पवार (वय 26, रा. मारूती मंदीराजवळ, दापोडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 7) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पवार यांच्यात पूर्वीची भांडणे आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी पवार हे दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी शिवीगाळ करीत सुरवातीला हाताने आणि त्यानंतर खुर्चीने मारून पवार यांना गंभीर जखमी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like