Pune : भारतीय विद्या भवनमध्ये शुक्रवारी ‘दिवाळी पहाट’

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट निमित्त ‘सुरिले नगमे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, 25 ऑकटोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. या कार्यक्रमात मराठी ,हिंदी भक्तिगीते ,भावगीते,नाट्यगीते,लोकसंगीत,गझल,हिंदी -मराठी द्वंद्वगीते सादर केली जाणार आहेत.

या कार्यक्रमात बिल्वा द्रविड-मोहोळकर, दयानंद घोटकर, राजेंद्र हसबनीस, डॉ नरेंद्र चिपळूणकर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 93 वा कार्यक्रम आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.