Pimpri : बाहेर जातो म्हणून गेलेला 12 वर्षीय मुलगा बेपत्ता

एमपीसी न्यूज – बाहेर जातो म्हणून 12 वर्षीय मुलगा घराबाहेर पडला. त्यानंतर तो 12 तास उलटून देखील घरी परतला नाही. ही घटना शनिवारी (दि. 29) रिव्हर रोड,  पिंपरी येथे घडली.

शमीम रमजान खान (वय 12, रा. लक्ष्मी धर्मशाळा, सिमेंटच्या दुकानाजवळ, रिव्हर रोड, पिंपरी. मूळ रा. बीजावार, जि. छत्तरपूर, मध्यप्रदेश) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीम मध्यप्रदेशमधील बिजावार येथील आहे. पिंपरी येथे त्याची मावशी राहते. मागील आठ महिन्यांपासून तो मावशीकडे राहत होता. त्याच्या मावशीच्या पतीचे पिंपरी येथे कापडाचे दुकान आहे. तो मागील आठ महिन्यांच्या कालावधीत दुकानात देखील सारखा जात होता. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो बाहेर जातो म्हणून निघून गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु शमीम मिळाला नाही.

यावरून इम्रानखान जहूर खान यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. शमीम बाबत काही माहिती मिळाल्यास पिंपरी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.