Talegaon : शौर्य दिनानिमित्त शहरातील माजी सैनिकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – शौर्य दिनानिमित्त तळेगाव दाभाडे मोहननगर येथे राहत असलेले माजी सैनिक कॅप्टन रघुनाथ कदम, कॅप्टन आदेशजी जगदाळे, कॅप्टन ज्ञानेश्वर वांगेकर यांचा तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान करून अभिवादन केले. तसेच यावेळी पाकिस्तानमध्ये “सर्जिकल स्ट्राईक”द्वारे दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करुन ७० दहशतवाद्यांना यमसदनी धाडणा-या शूरवीर जवानांना शतशः वंदन करण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष रविंद्र अण्णा आवारे, महिला मोर्चा अध्यक्ष नगरसेविका शोभाताई भेगडे, महिला मोर्चा कार्याध्यक्ष चारुशीला काटे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, संघटक सुनिलभाऊ कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्रजी धारणे हे उपस्थित होते.

भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष भास्करराव भेगडे यांनी सैनिकांच्या कार्याचा गौरव करुन आपल्या मनोगतामध्ये आभार मानले. सरचिटणीस निलेश मेहता यांनी चर्चा करताना OROP चा विषय काढला असता माजी सैनिकांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचे कौतुक केले. उपाध्यक्ष प्रमोद देशक यांनी माजी सैनिकांचा परिचय करुन दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.