Talegaon : तळेगाव शहरात बुधवारी येणार विकसित भारत संकल्प यात्रा

एमपीसी न्यूज – केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त ( Talegaon) विद्यमाने भारत सरकारद्वारे सुरु केलेल्या विविध प्रमुख लोककल्याणकारी योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. या संकल्प यात्रेचा रथ बुधवारी (दि. 3) तळेगाव दाभाडे शहरात येणार आहे.

MPSC : रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाद्वारे या संकल्प रथाची रचना करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्व नागरिकांना लाभ मिळावा व सर्वांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा केली जात आहे.

तळेगाव दाभाडे शहरात बुधवारी दोन ठिकाणी हा रथ थांबेल. चाकण रस्त्यावरील मराठा क्रांती चौकात आणि मारुती मंदिर चौकातील नगर परिषद कार्यालयासमोर रथ उभा असेल. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले ( Talegaon) आहे.

खालील योजनांची माहिती मिळेल
आयुष्मान भारत कार्ड
आरोग्य संबंधी योजना
स्वच्छ भारत अभियान (नागरी)
पीएम स्वनिधी योजना
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री पाठ्विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना
बँकेमार्फत विविध कर्ज योजना
स्वनिधी से समृद्धी तक
उज्वला योजना
आधार अपडेट
मुद्रा कर्ज योजना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.