Talegaon Dabhade : तळेगाव शहरात श्री गणेश जयंती भक्तिमय वातावरणात साजरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात ( Talegaon Dabhade) मंगळवारी (दि.13) श्री गणेश जयंती उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली. राजगुरव कॉलनी येथील श्री गणेश मंदिर, सुर्यमुखी श्री गणेश मंदिर आदी ठिकाणी श्रीगणेश जयंती साजरी करण्यात आली. श्रीं चा अभिषेक, गणेश याग, महिलांचे अथर्वशीर्ष पठन, गणेश जन्म, भजन, महाआरती आदी धार्मिक विधी करण्यात आले. 

राजगुरव कॉलनी येथे आमदार सुनील शेळके, अशोक काळोखे, राजेंद्र गोरे, हरीष मिस्त्री उपस्थित होते. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती सोहळा पार पाडण्यासाठी श्री गणेश मंडळ विश्वस्थ मंडळाने परिश्रम घेतले.

PCMC : आता महापालिका  राबविणार ‘पे अँड पार्क’ योजना

आनंद वनश्री नगर येथे सुनील किर्लोस्कर, स्वरदा किर्लोस्कर,यांच्या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मावळ शिक्षण प्रतिष्ठान सहसचिव वसंत पवार, अध्यक्ष श्रीमंत रोडे,सचिव आबासाहेब आळगड्डे, खजिनदार सतीश लोखंडे, बापूसाहेब पवार, राजेंद्र दहितुले उपस्थित होते. यावेळी गणेश काकडे यांच्या हस्ते आरती होऊन त्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र दहीतुले,शालीनी पवार,पुष्पलता शेट्टी, माणिक दहीतुले, शोभा चव्हाण यांनी परिश्रम ( Talegaon Dabhade) घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.