Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बबनराव भेगडे

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बबनराव भेगडे यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबाबतचे पत्र पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली बांधिलकी आणि आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पात्रात नमूद करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये समानव्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.