सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pimpri : फास्टटॅगला 15 डिसेंबरपर्यंत मुदत

एमपीसी न्यूज- वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या फास्टटॅगला आता 15 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

उद्या १ डिसेंबरपासून देशभरातील सर्व टोलनाक्यांवर फास्टटॅगची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र वाहनचालकांमध्ये त्याबाबत जनजागृती झाली नसल्यामुळे व फास्टटॅग मिळत नसल्याने प्रवासी वाहतूक संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर मान्यता देण्यात आली आहे.

फास्टॅग लावलेल्या चारचाकी वाहनांना टोलच्या रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही. टोलनाका ओलांडत असताना गाडीच्या काचेवर लावण्यात आलेला फास्टटॅग स्कॅन होऊन वाहनचालकाच्या बँक खात्यामधून पैसे वळते होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. टोल प्लाझावरच्या लांबच लांब रांगांमधून तुमची सुटका होणार आहे.

spot_img
Latest news
Related news