तळेगाव येथे 13 वर्षीय विद्यार्थीनीच्या विनयभंगप्रकरणी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल


एमपीसी  न्यूज – तळेगाव येथे एका 13 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन युवकावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तळेगाव स्टेशन येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या मागे घडली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्याने जबरीने  विद्यार्थिनीच्या हाताला धरून ओढून रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या मागे नेऊन तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने नंतर घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.