BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon dabhade : आजपासून मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आज बुधवारपासून मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उदघाटन आज संध्याकाळी 4 वाजता गणेश शिंदे यांच्या ‘जीवन सुंदर आहे’ या व्याख्यानाने होणार आहे. ही व्याख्यानमाला कांतीलाल शहा विद्यालयातील स्वर्गीय केशवराव वाडेकर सभागृहात दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे.

माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांनी केलेल्या सामाजिक व सार्वजनिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच हा सामाजिक वसा व वारसा विद्यार्थी, पालक व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह व कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक रामदास काकडे यांनी दिली.

व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष आहे. त्यानिमित्ताने विचारधन ऐकण्याची उत्तम संधी विद्यार्थी, पालकवर्ग, नागरिकांना मिळणार आहे. असे व्याख्यानमालेचे आयोजक, निमंत्रक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, विद्यालय विकास समिती सदस्य, कार्यक्रमाचे निमंत्रक आणि संयोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे व कार्यक्रमाचे निमंत्रक प्राचार्य डाॅ एस के मलघे यांनी सांगितले. व्याख्यानमालेचा लाभ मोठया संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like