Pune : जर्मन लेखकाच्या प्रभू येशू वरील मराठी भक्तीगीतांच्या सीडीचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- एच. बँलन्टाईन या जर्मन लेखकाची प्रभू येशू वरची भक्तीगीते आता सीडी द्वारे मराठीत आली असून या गाण्याच्या सीडीचे प्रकाशन सोमवारी (दि. 10) जोसेफ साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील गायक सुधाकर गायकवाड, आणि त्यांची कन्या मेरी गायकवाड यानी त्यासाठी पुढाकार घेतला. या सीडीमधील निवडक भक्तीगीते सादर करण्यात आली.

सोनाली साळवी ,विश्वास गांगुर्डे ,राज गांगुर्डे यावेळी उपस्थित होते . पुण्यातील चर्चेस मध्ये या सीडी चे वितरण करण्यात येणार आहे .

‘अपोलो म्युझिक प्रेझेंट’, पुणेच्या वतीने’ येशू प्रभू माझा ‘या नावाने 10 भक्तिगीते ध्वनिमुद्रित करण्यात आली आहे. भारतीय वाद्यांचा वापर हे या गीतांचे वैशिष्ट्य आहे . ‘येशू प्रभु माझा’ या भक्तीगीताची संकल्पना सुधाकर गायकवाड यांची असून ‘अपोलो म्युझिक प्रेझेंट’च्या मेरी गायकवाड यांनी निर्मिती केली आहे. ही भक्तीगिते जर्मन लेखक एच. बँलन्टाईन यांनी लिहिली असून ते जर्मनीमधील प्रसिद्ध लेखक – साहित्यिक आहेत. मराठीत रेव्हरंड टिळक ,पंडिता रमाबाई यांची येशुंवरील भक्तिगीते उपलब्ध आहेत. मात्र ,जर्मन लेखकाची गीते प्रथमच उपलब्ध झाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.