Wakad : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीला 14 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – टायर विक्रीच्या उद्योगात भागीदारी करणास संगीत महिन्याला 1 लाख रुपये व नफ्याच्या एक टक्का देण्याचा बहाणा करत पती-पत्नीला 14 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी 2021 ते 1 मे 2023 या कालावधीत रहाटणी येथे घडला आहे.

Chikhali : चिखली घरकुलमधील पोलीस स्टेशनला ‘हिरवा झेंडा’

या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून रिझवान दिलावर मणेर (रा.थेरगाव) याच्या विरोधात वाकड (Wakad) पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.19) फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पतीला आरोपीने मेट्रो ट्रेडर्स अन्ड टायर्स या टायर विक्रीच्या व्यवसायात पैसा गुंतवण्य़ास सांगितले. त्या बदल्यात महिन्याला 1 लाख व विक्रीच्या नफ्यावर एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवले.

त्यानुसार त्याने फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 13 हजार रुपये घेतले.मात्र भागीदारी किंवा करार नाम्यानुसार आज तायागायत 1 लाख रुपये किंवा 1 टक्के नफा दिला नाही. यावरून फिर्यादी यांनीपोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वाकड (Wakad) पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.