Pimpri : कष्टकरी महासंघाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज –  कष्टकरी संघर्ष महासंघ अर्थात कसम सुकाणु समितीचे  एक दिवसीय  प्रशिक्षण  शिबिर  रेनीगुंटा आंध्र प्रदेश येथे  उत्साहात संपन्न झाले.

Wakad : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीला 14 लाखांचा गंडा

या शिबिरात 50 पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला कष्टकरी, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न व राष्ट्रीय अहवाल मांडून ते सोडविण्यासाठी उपाययोजना करणे व महाराष्ट्रातील इतर  जिल्ह्यात संघटना  बांधणी करून सामूहिक संघर्ष करणे व त्यांचे हक्काची लढाई यशस्वी करण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, राज्य संयोजक तुषार घाटुळे,संघटक सचिव चंद्रकांत कुंभार,सिद्धनाथ देशमुख,निलेश कुंभवडेकर,किरण साडेकर,नाना कसबे, उमेश डोर्ले,  मनोज यादव आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की देशभरातील 50 कोटीच्या संख्येत असणाऱ्या कष्टकरी कामगारांसाठी महत्वाचे कायदे नाहीत म्हणून त्यांचे जीवन अस्थिर व धोकादायक आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे.  कामगार हितासाठी अखंड कार्यरत असल्याने महासंघाचा विस्तार हजारोंच्या संख्येने वाढत गेला आहे.

कसमच्या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या पदाधिकारी यांची जबाबदारी भविष्यात वाढणार असून विविध जिल्ह्यात  कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेऊन संघटनात्मक बांधणी करून जिल्हा अध्यक्ष व समन्वयक नेमणूक करण्यात येणार असून यासाठी लवकरच दौरा करण्यात येणार आहे.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामगार, लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न प्राधान्य द्यावे . यावेळी कायदा विभाग, योजना, प्रस्ताव, आंदोलने, मेळावा बाबत  मार्गदर्शन करण्यात आले. येथील असंघटित कामगारांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले . प्रास्ताविक सिद्धनाथ देशमुख यांनी तर आभार चंद्रकांत कुंभार यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.