Alandi : पाणी टंचाई समस्या न सोडवल्यास नगरपरिषदेस हंडा मोर्च्याचा इशारा

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आळंदी ग्रामस्थांच्या (Alandi) वतीने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना पाणी टंचाई दूर होण्याकरिता व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास नगरपरिषदेस हंडा मोर्चा पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी डी डी भोसले, प्रकाश  कुऱ्हाडे, साहेबराव कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, सतिश कुऱ्हाडे, संदेश तापकीर, पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे, उज्वला चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे मनपा मार्फत भामा आसखेडवरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याच्या कामास विलंब लागला होता.

तेथील तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर आळंदी जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात आला होता. पण तो पाणीपुरवठा कमी दाबाने असल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्या भरण्यास वेळ लागला होता. त्यामुळे शहरात तेव्हापासून अनियमित वेळी पाणीपुरवठा होत आहे.

शहरात गावठाण विभाग व हवेली विभाग असा दिवसाआड पाणीपुरवठा चालू आहे.

तसेच भामा आसखेडवरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याच्या कामास विलंब झाला. या सोबतच दर गुरुवारी शहरात पाणीपुरवठा बंद असतो. यामुळे सलग तीन दिवस शहराला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागला.

Wakad : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीला 14 लाखांचा गंडा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.