Alandi: आळंदी मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात

एमपीसी न्यूज – दि.19 रोजी आज शिवजयंती मोठ्या उत्साहात  (Alandi)सर्वत्र साजरी होत आहे. पहाटे पासून अनवाणी पायी शिवभक्त हाता  मध्ये शिवज्योत घेत धावताना दिसून येत होते.व त्यांच्या बरोबर असणाऱ्या चारचाकी वाहनां मध्ये ढोल ताशे वाद्य वाजवणारे शिवभक्त ही होते. 
आळंदी येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Alandi) स्मारकाच्या  येथे शिवराज्य प्रतिष्ठान आळंदी देवाची यांच्या वतीने आज  सकाळी 7 वा. छत्रपती शिवराय पुष्पहार वंदन व जिजाऊ  वंदना ,सकाळी 8 वा.विद्यार्थी व्याख्यान पोवाडे इ.कार्यक्रम संपन्न झाले. तर सकाळी 9 ते सायं.5 या वेळेत त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.व रात्री 7 ते  9 यावेळेत पोवाडे,शिवगीते ,शिवव्याख्यान इ. कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तसेच आळंदी शहरातील विविध सार्वजनिक मंडळे  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत.

 शिवजयंती निमित्त शिवस्मारकाला  विविव पक्षाच्या व अनेक संस्थेच्या मान्यवरांनी  पुष्पहार अर्पण करून छत्रपती  शिवाजी महाराजांना अभिवादन केले. शिवजयंतीच्या निमित्ताने  आकर्षक अशी फुळसजावट शिवस्मारक येथे  करण्यात आली आहे.
तसेच आळंदी नगरपरिषद मधील अधिकारी व कर्मचारी वृंद, नगरपरिषद आळंदी शाळा क्र. 4 येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. व  महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.