Koyali : हातभट्टी दारू बनवण्याचे दीड लाख लिटर कच्चे रसायन नष्ट

एमपीसी न्यूज – हातभट्टी दारू तयार करण्यासाठी (Koyali )लावलेले दीड लाख लिटर कच्चे रसायन पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने नष्ट केले. ही कारवाई रविवारी (दि. 18) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास भीवरेवस्ती, कोयाळी येथे केली.

गोपाळ चेतन मन्नावत (वय 30, रा. भीवरेवस्ती, कोयाळी) (Koyali )याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार समीर काळे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi:आळंदी येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाळ काळे याने हातभट्टी दारू तयार करण्यासाठी कोयाळी गावातील भीवरेवस्ती येथे ओढ्याच्या कडेला दारूभट्टी लावली. त्याने 75 हजार रुपये किमतीचे दीड लाख लिटर कच्चे रसायन लावले. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखेने कारवाई करून दारूभट्टी उध्वस्त केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.