Maharashtra News : महसूल गुप्तचर संचालनालयाने पकडले 15 कोटींचे कोकेन

एमपीसी न्यूज – महसूल गुप्तचर संचालनालयानं [The Directorate of Revenue Intelligence (DRI)] अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहीमेअंतर्गत मोठं यश मिळवले आहे. डीआरआयने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत. आदिस अबाबाहून ET 640 या विमानाने मुंबईत आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 1496 ग्रॅम इतका कोकेनचा साठा जप्त केला. याचे अंदाजीत बाजार मूल्य 15 कोटी रुपये इतके आहे.

Pune : नवीन वीज जोडण्यांसाठी महावितरणचा वेग; अवघ्या 24 ते 48 तासांत 1670 ग्राहकांना वीजजोडण्या

डीआरडीआयला याबाबत आधीपासूनच माहिती असल्याने, सातत्यपूर्ण चौकशी आणि पाळत ठेवली गेली होती. त्यानंतर अमली पदार्थांची  तस्करी रोखण्यासाठी ही नियोजनपूर्वक कारवाई केली गेली. या प्रवाशाच्या हालचाली संशस्पद वाटल्याने, विमानतळावर उतरताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली.

यात त्याच्याकडे कोकेनचा साठा सापडला. हे प्रतिबंधीत अमली पदार्थ ज्या व्यक्तीला दिले जाणार होते त्या महिलेला अटक करण्यातही संचालनालयाला यश आले आहे. अटक केलेली महिला ही युगांडाची नागरिक असून, नवी मुंबईत, वाशी इथे तिला अटक केले आहे.

हे अमली पदार्थ आणणाऱ्या आणि ते मागवणाऱ्या दोघांनाही अमली आणि मादक पदार्थ प्रतिबंध कायदा 1985 मधील तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.