Pimpri : रक्तदान शिबिरात 151 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – सांगवी परिसर महेश मंडळतर्फे चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ 19 व्या रक्तदान व मोफत नेत्रचिकित्सा तपासणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 151 जणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, शशिकांत कदम, संदीप गुगळे, लीलाबाई गुगळे, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष गोविंद मुंदडा, सतीश लोहिया आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात 151 रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य  केले. रक्तसंकलनसाठी पूना हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने सहकार्य केले. नेत्रतपासणी शिबिराचा लाभ 210 लोकांनी घेतला. यासाठी व्हिजन नेक्स्ट आय हॉस्पिटलचे सहकार्य मिळाले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल, दीपेश मालानी, भूषण हरकुट, पंकज टावरी, गणेश चरखा, तुषार माहेश्वरी, सौरभ केला यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.