मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pune News: पुणे रेल्वे विभागात एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यांत 16 कोटी 64 लाख रूपये दंड स्वरूपात वसूल

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागात नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान 21 हजार 736 लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले व त्यांच्याकडून 1 कोटी 68 लाख रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला.

तसेच 4700 जणांना अनियमित प्रवासासाठी 26 लाख 94 हज़ार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 249 जणांकडून 37 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यांत 2 लाख 32 हज़ार 108 केसेस मध्ये 16 कोटी 64 लाख रूपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.

PCMC: स्वच्छ सर्वेक्षणाच्या कार्यशाळेला दांडी; 11 उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दु दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकां द्वारे करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

Latest news
Related news