१७ जानेवारी : दिनविशेष

What Happened on January 17, What happened on this day in history, January 17. See what historical events occurred, which famous people were born and who died on January 17.

१७ जानेवारी : दिनविशेष

१७ जानेवारी – महत्वाच्या घटना

  • १७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
    १९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
    १९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
    १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
    १९५६: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
    २००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
    २००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

१७ जानेवारी – जन्म

  • १७०६: लेखक आणि संशोधक बेंजामीन फ्रँकलिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)
    १८९५: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७८)
    १९०५: भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.
    १९०६: भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २०००)
    १९०८: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९९४)
    १९१७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)
    १९१८: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे २०१४)
    १९१८: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’माल अमरोही यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
    १९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)
    १९४२: अमेरिकन मुष्टियोद्धा मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले यांचा जन्म.

१७ जानेवारी – मृत्यू

  • १५५६: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १५०८)
    १७७१: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन.
    १८९३: अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)
    १८९५: मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.
    १९३०: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचे निधन. (जन्म: २६ जून १८७३)
    १९६१: काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक लुमूंबा यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९२५)
    १९७१: स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२२)
    १९८८: अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन.
    १९९५: ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.
    २०००: गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.
    २००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.
    २००८: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९४३)
    २०१०: प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१४)
    २०१३: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्‍ना देवधर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
    २०१४: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.