Lonavala : बेकायदा प्लास्टिक विक्री करणार्‍या 18 दुकानांवर कारवाई; 350 किलो प्लास्टिक जप्त

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी लोणावळा शहरात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच या कारवाईमध्ये शहरातील वेगवेगळ्या १८ दुकानदार आणि होलसेलर्सकडून ९० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुमारे अठरा अधिकाऱ्यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या मदतीने वरील धडक कारवाई केली. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईमध्ये शहरातील अनेक नामांकित अस्थापनांवर सदर कारवाईची कुऱ्हाड कोसळली. लोणावळा शहरातील सुमारे २०० दुकाने, हॉटेल्स, चिक्कीची दुकाने या कारवाई दरम्यान तपासण्यात आली. यापैकी यातील १८ जणांकडून एकूण साडेतीनशे किलो पेक्षा अधिक वजनाचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले हे सर्व प्लास्टिक नंतर नष्ट करण्यात आले.

या कारवाईमध्ये प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, नितीन शिंदे, उपेंद्र कुलकर्णी १४ इतर अधिकारी आणि लोणावळा नगरपरिषदे अधिकारी खाडे, वाघमारे यांच्यासह नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.