Khed : लॉकअप तोडून दोन आरोपी फरार

एमपीसी न्यूज – चोरीच्या गुन्ह्यात पकडलेले आरोपी पोलीस लॉकअपची खिडकी तोडून पळून गेले. हा प्रकार आज (सोमवारी) पहाटे चारच्या सुमारास खेड पोलीस ठाण्यात घडला.

विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे), राहुल देवराम बोएकर (वय 26, रा. बोएकरवाडी, ता. कर्जत जि. अहमदनगर) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडमधील एका चोरीच्या गुन्ह्यात खेड पोलिसांनी विशाल आणि राहुल यांना मंगळवारी (दि. 16) अटक केली. बुधवार (दि. 17) रोजी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवार (दि. 20) रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुन्हा दोन दिवसांची सोमवार (दि. 22) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आज दोघांनी पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. दरम्यान आज पहाटे दोघांनी पोलीस लॉकअपची खिडकी तोडून पोलीस ठाण्यातून पोबारा केला. खेड पोलीस पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.