BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कडाचीवाडी येथे 2000 वृक्षांची लागवड

"निर्धार ३३ कोटी वृक्ष लागवडीचा" "सहभाग सर्वांचा, निर्धार हरित महाराष्ट्राचा"

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनच्या वतीने व ग्रामपंचायत कडाचीवाडी यांच्या माध्यमातून कडाचीवाडीतील पाझर तलाव येथे २००० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात ग्रामस्थांनी श्रमदानातून आपला सहभाग नोंदवला.

या प्रसंगी लोकनेते अशोकराव खांडेभराड, शिवसेना ता. प्रमुख रामदास आबा धनवटे, कामगार नेते गणेश पर्‍हाड, सरपंच सुंदरबाई लष्करे, उपसरपंच निर्मलाताई कड, ग्रामपंचायत सदस्य महादेव बचुटे, प्रियंका कड, सोनलताई कोतवाल, राजाराम ठाकर आदी उपस्थित होते.

वृक्ष लागवडीत सरपंच शामराव कड,  उपसरपंच माउली कड, पांडुरंग लष्करे, ग्रामस्थ किरण कड, सोमनाथ कोतवाल, शुभम कड, प्रदीप आगरकर, विश्वनाथ बचुटे, सैनिक मल्हारी धनवटे, भाऊसाहेब खांडेभराड, गोटुराम खांडेभराड, गोविंद ठाकर या सर्वांनी सहभाग घेतला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3